उस्मानाबाद : तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा विठ्ठलवाडी येथे आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश.
सरपंच सौ.कल्पना हिराचंद शिंदे, माजी सरपंच श्री.हिराचंद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिरुद्ध कस्पटे, श्री.लक्ष्मणराव परसे, सौ.शामलताई इंगळे, सौ.भाग्यश्रीताई निंबाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत प्रवेश केला. यावेळी आमदार पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या !!
पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या कर्तृत्वातून भारताला जोडण्याचे, एकसंध ठेवण्याचे काम करत आहेत. सोबतच राष्ट्राला विकासाच्या दिशेने पुढे नेत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकजण राष्ट्रसेवेच्या कार्यात सहभागी होत आहेत, याचा अत्यंत अभिमान वाटतो.असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले