लोहारा : शहरात परिसरातील गावातील गरजू नागरिकांसाठी लोहारा मल्टीस्पेशलिटी क्लिनिक यांच्या विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजित शिबिरात ६३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
लोहारा शहरातील लोहारा मल्टीस्पेशालिटी क्लिनिक यांच्या माध्यमातून सातत्याने शहरातील तसेच परिसरातील गावातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते आहे. त्याच अनुषंगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आयोजित शिबिराचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आरोग्य क्षेत्रात विविध आजांरावरील तज्ञ डॉक्टर यामधे उपस्थित होते. यामध्ये श्रीशैल जळकोटे (हृदयरोग तज्ञ),श्रीराम देवकते (अस्थिरोग तज्ञ),रमण महाळगीकर (न्युरोसर्जन),हेमंत केंद्रे,शुभम जमादार (मदुमेह तज्ञ) आदी तज्ञ डॉक्टर यामधे उपस्थित होते.या शिबिराच्या माध्यमातून विवीध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामधे एकूण ६३० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. क्लिनिकच्या माध्यमातून सातत्याने या शिबिराचे आयोजन करण्यात येते आहे याबदल रुग्णांनी आयोजकांचे आभार मानले.