जिल्ह्यात शून्यातून ओळख करणारे नितीन (शेट) बिक्कड यांचा जन्म दिवस , विशेष लेख
उस्मानाबाद : जिल्ह्यात शून्यातून ओळख निर्माण करणारे नितीन (शेट) बिक्कड यांचा जन्म वाशी तालुक्यातील फकराबाद या गावी शेतकरी कुटुंबात झाला.
नितीन (शेट) बिक्कड यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्यांचे मन शेतात रमेना म्हूणन त्यांनी पुणे येथे जाऊन मिळेल ते कामे करून जनसंपर्क वाढवला छोटे मोठी कामे करत ट्रॅव्हलिंग व्यवसायात जम बसवला. त्यांनी क्षेत्रात भरारी घेतली त्यांचा स्वभावामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले. त्यांना समाजसेवेची आवड असल्यामुळे त्यांनी कमी वयामध्येच राजकारणात प्रवेश केला.
राजकारणात प्रामाणिकपणेच्या व उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर व ते फकराबादचे सरपंच झाले व राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष म्हूणन त्यांची निवड झाली. नितीन(शेट )बिक्कड यांनी शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या लाईटचा प्रश्नावर व जळणाऱ्या डीपी लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी दिवस-रात्र काम केले. भागातील जनतेची सेवा करण्यासाठी स्वखर्चातून रुग्णवाहिका 24 तास सेवा उपलब्ध करून दिली. गावातील गरीब विद्यार्थी यांना गणवेश व शालेय उपयोगी साहित्य वाटप केले. गावातील मुलांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य व ग्राउंड उपलब्ध करून दिले. कोरोना काळात स्वतः लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एकमेकांशी संपर्क करत नव्हते परंतु नितीन बिक्कड यांनी कोरोना रुग्णांना स्वतःच्या गाडीमध्ये रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती केले व रुणांना धीर दिला. गाव कोविड मुक्त करण्यासाठी गाव पातळीवर जिल्हा पातळीवर प्रयत्न केले. अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत.
वाशी तालुक्याला अशा एका नेतृत्वाची गरज होती ती गरज आज आपल्या माध्यमातून नक्की पूर्ण होईल आणि लोकांची कामे पुढेही मार्गी लावली जातील. आपल्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत जावो आणि आपल्या लोकांची सेवा आपल्या हातून घडत जाऊ हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. नितीन ( शेट ) बिक्कड यांना 'उस्मानाबाद न्यूज' परिवार कडुन वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.