भुयार चिंचोली येथे ग्रामपंचायतच्या विविध उपक्रमांतर्गत २५० जेष्ठांना ब्लँकेट , मुस्लीम कुंटूबांना फराळ , ४५ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण
-----------
उमरगा प्रतिनिधी : तालुक्यातील भुयार चिंचोली येथे सरपंच रणजीत गायकवाड यांच्या पुढाकारातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रमा अंतर्गत गावातील मुलींच्या लग्नासाठी तसेच जन्मानंतर प्रत्येकी ५ हजार रुपये , गावातील ज्येष्ठांना ब्लॅंकेट चे वाटप उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार यांच्या हस्ते दि . २९ रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आले . यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, राष्ट्रवादी जिल्हा सचिव नितीन बागल, जिल्हा उपाध्यक्ष भीमा स्वामी, लोहारा तालुका अध्यक्ष सुनील साळुंखे, युवक अध्यक्ष शमशोद्दीन जमादार, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे संचालक गोविंदराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती .
ग्राम निधीतून मुलीच्या लग्नासाठी ५ हजार रू व मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये देण्याचा उपक्रम सरपंच रणजीत गायकवाड यांच्या पुढाकारातून सुरुवात करण्यात आला होता. मागील वर्षीही याचे वाटप करण्यात आले आहे . सन 2022 मध्ये जन्मलेल्या बारा मुलींना ग्रामपंचायतच्या वतीने प्रोत्साहन निधी तर सन 2022 मध्ये लग्न झालेल्या गावातील सतरा मुलींच्या कुटुंबांना प्रत्येकी 5000 रुपये आर्थिक मदत , थोडेसे मायबापासाठी या उपक्रमांतर्गत गावातील 250 ज्येष्ठ नागरिकांना ब्लॅंकेटचे वितरण, ग्रामपंचायतीमार्फत गावातील 45 महिलांना शिलाईचे प्रशिक्षण प्रमाणपत्र ,गावातील 200 मुस्लिम कुटुंबीयांना फराळाचे वाटप या विविध स्तुत्य उपक्रमाचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले .
या नवीन्यपूर्ण उपक्रमासाठी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमासाठी सरपंच रणजित गायकवाड, ग्रामसेवक श्रीमती. बी. व्ही. हंगरगेकर, ऍड. संजय पाटील, पै.सचिन गायकवाड, उमरगा शहराध्यक्ष खाजा मुजावर, युवक विधानसभा अध्यक्ष बाबा पवार ,नेताजी कवठे, कुमार थिटे , प्रमोद गायकवाड, सुधाकर पाटील ,लाडलेसाब तांबोळी ,तानाजी गायकवाड, राहुल थोरात, सुवर्णा भोसले ,उषा बिराजदार, मंदाकिनी बिराजदार ,सचिन पाटील, कमलाकर पाटील ,तुकाराम पाटील, अशोक पवार, अशोक गायकवाड, विक्रम गायकवाड ,शेषराव गायकवाड, प्रभाकर पाटील, रमेश बिराजदार ,दिनकर गायकवाड ,पंडित देशमुख ,नेताजी गाडेकर ,बबन मुल्ला, इस्माईल मुल्ला ,चांद आलुरे, यासीन मुल्ला ,विद्यासागर गायकवाड, धनराज शिवशरणे ,हनुमंत शिंदे, नंदकुमार सुरवसे ,महादेव गायकवाड, महेश पाटील ,दिगंबर गायकवाड ,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .