उस्मानाबाद एमआयडीसी जवळील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वाशी येथील २४ वर्षीय महिलेचा मृत्यू!
उस्मानाबाद :
धुळे सोलापूर महामार्गावरील एमआयडीसी जवळील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वाशी येथील 24 वर्षीय महिला सोनाली आकाश जाधव यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की वाशी येथील रहिवासी असणारे आकाश जाधव व सोनाली जाधव हे दोघे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आपल्या दुचाकीने प्रवास करत असताना उस्मानाबाद शहराजवळील एमआयडीसी येथे असणाऱ्या उड्डाण पुलावर एका अज्ञात वाहनाचा दुचाकीला धक्का लागल्याने सोनाली जाधव या त्या वाहनाच्या खाली जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर आकाश जाधव हे जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच आनंदनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून आकाश जाधव यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दिवसेंदिवस या महामार्गावर अपघात वाढत चालले असले तरी महामार्ग पोलीस मात्र कधीही मदतीसाठी तात्काळ उपलब्ध होत नसल्याची खंत नातेवाईकांसह नागरिकांतून चांगलीच चर्चली जात होती .
१०३३ आय आर बी कंपनीची ॲम्बुलन्स अपघात घडल्या ठिकाणी तात्काळ उपलब्ध झाल्याने मयत सोनाली जाधव व जखमी आकाश जाधव यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मदत झाली.
या राष्ट्रीय महामार्गावर जास्त वाहन चालून काही ठिकाणी रोडच्या आत मध्ये कर्वे प्रकारचे गाडीच्या चाखाप्रमाणे खड्डे पडले आहेत यामुळे देखील छोट्या मोठ्या अपघातांची वाढ होताना दिसत आहे असे या ठिकाणी नागरिकांनी मत व्यक्त केले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.