पक्ष संघटनेच्या सर्व अभियानात सक्रिय सहभाग घेऊन पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा विचार तळागाळात पोहचवावा - संजय कौडगे

0



पक्ष संघटनेच्या सर्व अभियानात सक्रिय सहभाग घेऊन पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा विचार तळागाळात पोहचवावा - संजय कौडगे

Osmanabad :  भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून आलेले सर्व कार्यक्रम पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात पूर्ण क्षनेतेनी राबवायला हवेत यातुनच पक्षाचा विचार जनतेपर्यंत जाणार आहे असे वक्तव्य भाजपचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांनी केले ते भाजपाच्या जिल्हा कार्यक्ररिणी बैठकीत बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे तसेच भाजपाचे शिक्षक मतदार संघातील उमेदवार किरण पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी संजय कौडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद अर्थात मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक बुथ स्तरापर्यंत व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करताना वस्ती भेट अभियान, धन्यवाद मोदीजी, लाभार्थी संवाद, कोरोना लसीकरण, कोरोना काळातील मोफत धान्य वाटप, पंतप्रधान किसान सन्मान निधी या लोकप्रिय ठरलेल्या कार्यपद्धतीची जनतेत जाऊन चर्चा करावी त्यासाठी पक्षाने दिलेले कार्यक्रम पूर्ण क्षमतेने राबवावेत असे आवाहन केले.

याप्रसंगी भाजपा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण पाटील यांनी शिक्षक मतदार संघात पक्षाचा विजय व्हावा त्यासाठी सर्वांनी योगदान करण्याचे आवाहन केले.

भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाचा आढावा मांडला. तसेच ज्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा एक नंबरचा पक्ष झाला त्याचप्रमाणे येणाऱ्या जिल्हापरिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीत जिल्ह्यातील एक नंबरचा पक्ष असे अशी ग्वाही दिली.

या बैठकीत भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणी मधील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल युवा वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेतील विजयी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्र.का.सदस्य दत्तात्र्यय कुलकर्णीअनिल काळे, संताजीराव चालुक्य, खंडेराव चौरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जि. प.माजी अध्यक्ष नेताजी पाटील महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदाताई पुणगुडे, सरचिटणीस नितीन भोसलेप्रदीप शिंदे यांच्यासह जिल्हयातील भाजपा व सर्व आघाडी मोर्चाचे जिल्हा, तालुका पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top