२८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील उमेदवारांसाठीपंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा , नामांकित कंपन्यांचे अधिकारी ४८१ पदांसाठी उमेदवारांची निवड करणार

0

२८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील उमेदवारांसाठीपंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा , नामांकित कंपन्यांचे अधिकारी ४८१ पदांसाठी उमेदवारांची निवड करणार

 

उस्मानाबाद,दि.22(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र (BTRI) आणि तुळजापूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खाजगी क्षेत्रातील नामांकित उद्योजक, कंपनी यांच्याकडील 481 पदे भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक पुरुष आणि स्त्री उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया करणार आहेत.

वेतन आणि सुविधा या पद तसेच शैक्षणिक योग्यतेनुसार राहील याबाबत कंपनीचे अधिकारी मुलाखतीवेळी माहिती देतील.

शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), अनुभव असल्यास प्रमाणपत्र, एम्पलॉयमेंट रजिस्ट्रेशन आणि पासपोर्ट साईझ फोटो आदी कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीसह रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी स्वखर्चाने हजर राहून जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुळजापूरचे प्राचार्य आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.

उमेदवारांना काही अडचण असल्यास 02472-299434 आणि आयटीआय तुळजापूर 9890947246 व 8329382178 या क्रमांकावर संपर्क साधावा. मेळावा हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नळदुर्ग रोड, तुळजापूर या ठिकाणी बुधवार, दि.28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top