तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा चौकातील विद्युत रोषणाईचे काम पूर्ण - सौ.अर्चनाताई पाटील यांच्या शुभहस्ते हस्ते बटण दाबून लोकार्पण

0
तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा चौकातील विद्युत रोषणाईचे काम पूर्ण - सौ.अर्चनाताई पाटील यांच्या शुभहस्ते हस्ते बटण दाबून लोकार्पण  

महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार राणजगजितसिंह पाटील हे प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण करणे या कामातील विद्युतीकरण करणे (रु.५ .१५ लक्ष) काम काही दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले होते. सदरील रोषणाईचे काम पूर्ण झाले असून जिल्हा परिषदेच्या मा.उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी युवा नेते श्री.विनोद (पिटुभैय्या) गंगणे, श्री.सचिन रोचकरी, श्री.बापु कणे, पोलिस निरीक्षक काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती. या रोषणाईमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्य आणखीन फुलले असून या विद्युत रोषणाईचा आनंद शहरातील नागरिकांना आता घेता येणार आहे.  

तुळजापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे यावेळी सौ.अर्चनाताईनी आपल्या मार्गदर्शन भाषणत आवर्जून सांगितले. तुळजापूर शहरातील विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. 

कार्यक्रमास श्री.पंडीतराव जगदाळे, श्री.नारायण नन्नवरे, श्री.विजय कंदले, श्री.आनंद कंदले श्री.विशाल रोचकरी, श्री.अविनाश गंगणे, श्री.शांताराम पेंदे, श्री.औदुंबर कदम, श्री.अमर हंगरगेकर, श्री.किशोर साठे, श्री.माऊली भोसले, श्री.अजित परमेश्वर, श्री.नरेश अमृतराव, श्री.आबासाहेब कापसे, श्री. गुलचंद व्यवहारे, श्री.नागेश नाईक, श्री.शिवाजी बोधले, श्री.सुहास साळुंके, श्री.नानासाहेब डोंगरे, श्री.नितिन भांजी  यांच्यासह तुळजापूर येथील प्रमुख कार्यकर्ते व नागरिक हजर होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top