ग्रामीण भागात आरोग्य संस्थेतील प्रसूतीच्या संख्येत वाढ

0
ग्रामीण भागात आरोग्य संस्थेतील प्रसूतीच्या संख्येत वाढ

उस्मानाबाद: जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात आरोग्य संस्थेत होणाऱ्या प्रसूती चे प्रमाण वाढलेले दिसून येत आहेत. माहे एप्रिल 2022 च्या तुलनेत सध्या मोठ्या प्रमाणात प्रसुती या आरोग्य संस्थेत झालेल्या आहेत. माहे एप्रिल 2022 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 272 प्रसूती झाल्या होत्या. तर माहे ऑक्टोबर 2022 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 426 प्रसूती या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात झालेल्या आहेत. जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी सांगितले.

    यासाठी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान,  मातृत्व संवर्धन दिन, आरोग्यवर्धिनी मातृत्व दिन तसेच ग्राम मातृत्व दिन अशा प्रकारे विविध दिनांचे आयोजन करून त्यामध्ये गरोदर मातेच्या नोंदणीपासून गरोदर मातेच्या तपासण्या करण्यात येतात. या दिवशी गरोदर मातेला मोफत सोनोग्राफीसाठी संदर्भित केले जाते, मातीचे वजन, उंची, रक्तदाब, हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात येते. रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात येते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आल्यास त्या गरोदर मातेला आयर्न सुक्रोज चा डोस दिला जातो. प्रसूतीत काही अडचण आल्यास गरोदर मातेस 102/108 च्या गाडीने संदर्भित केले जाते.
उपरोक्त प्रमाणे गरोदर मातांना सर्व स्तरांवर चांगल्या सेवा उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये आरोग्य विभागाबाबत विश्वासाहर्ता निर्माण झालेली आहे. याच विश्वासाहर्ते पोटी आरोग्य संस्थेत होणाऱ्या प्रसूतिच्या प्रमाणत वाढ झालेली दिसून येते.

जिल्हास्तरावरून संस्थेतील प्रसुती वाढवण्यासाठी आठवड्याला आढावा घेतला जातो. ज्या संस्थेचे काम कमी आढळून येईल त्या संस्थेस संस्थेतील प्रसूतीचे प्रमाण वाढविण्याचे सांगितले जाते.

सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूती गृह सुसज्य व सुस्थितीत आहेत प्रसुतीचे अपेक्षित दिनांक व  प्रसुतीचे अपेक्षित ठिकाण कार्यक्षेत्रातील प्रसूती झाल्या किंवा नाहीत याचाही नियमितपणे आढावा घेऊन त्यामध्ये जास्तीत जास्त प्रसूती या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र संस्थेत होतील यासाठी प्रयत्न केले जातात. तरी सर्व नागरिकांनी मोफत प्रसुतीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रांजल शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top