जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
उस्मानाबाद,दि.12(जिमाका):- जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिलहाधिकारी (सा.प्र.) अविनाश कोरडे, तहसिलदार प्रविण पांडे, सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार पकंज मंदाडे, नायब तहसिलदार महसूल अर्चना मैदर्गी, कुलकर्णी आदी उपस्थित होते.