पत्रकार देवीदास पाठक यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार

0

पत्रकार देवीदास पाठक यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार


उस्मानाबाद दि.१४ (प्रतिनिधी) - औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या सिनेटपदी राज्यपाल नियुक्त कोट्यातून पत्रकार देविदास पाठक यांची निवड झाल्याबद्दल पत्रकारांच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन दि.१४ जानेवारी रोजी सत्कार करण्यात आला.

उस्मानाबाद येथील प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालयासमोर सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार राजूभाऊ वैद्य, रहीम शेख, प्रा. सतीश मातने, बिभीषण लोकरे, जफरोद्दीन शेख, प्रशांत कावरे, अमजद सय्यद, कुंदन शिंदे, बाबासाहेब अंधारे, पांडुरंग मते, काकासाहेब कांबळे, वैभव पारवे, उपेंद्र कटके, राहुल कोरे, सुधीर पवार, श्रीराम क्षीरसागर, धनंजय पाटील, नवाब मोमीन, सलीम पठाण, कैलास चौधरी, बालाजी सुरवसे, ओंकार कुलकर्णी, मुकेश नायगावकर व मल्लिकार्जुन सोनवणे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top