google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 बसवंतवाडी येथे बालिका दिन उत्साहात साजरा

बसवंतवाडी येथे बालिका दिन उत्साहात साजरा

0
बसवंतवाडी येथे बालिका दिन उत्साहात साजरा

तुळजापूर (दि.3) तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथील प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.
 या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भारत कांबळे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. सर्व शिक्षकवृंदानीही बालिका दिनी अभिवादन केले. या निमित्त 1 ली 8 वी तील साधारण 15 विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा केल्या होत्या. बालिका दिनानिमित्त शिक्षक टेंगळे एस.एस., चौधरी पी.ए., ढोणे डी.एच. आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सायली वाघमारे, साक्षी पारवे, अक्षरा पारवे, मानसी चव्हाण, संचिता बोबडे, संध्याराणी ताटे, नंदिनी बनसोडे इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य राजेंद्र पारवे यांनीही बालिका दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी साक्षी पारवे हिने तर आभार वैष्णवी पारवे या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमासाठी गावचे प्रथम नागरिक सरपंच नागेश बनसोडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष मल्हारी बोबडे, सदस्य राजेंद्र पारवे यांच्यासह सर्व शिक्षक व 162 विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top