कळंब - आजच्या धकाधकीच्या जीवनात भारतीय संस्कृतीचा विसर पडत आहे संस्कृती जोपासण्याचे महान कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून केले तेच विचार आजच्या तरुण पिढीने स्वतः मध्ये अंगीकृत करावे असे प्रतिपादन विद्याभवन हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका तथा इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा राजमती तीर्थकर यांनी केले.
कळंब शहरातील श्री.भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ जयंतीनिमित्त प्रा.मोहिनी शिंदे-चोंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादनपर मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी प्राचार्या मनोरमा शेळके-भवर,विद्याभवन विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षिका राजमती बचाटे- तीर्थकर,भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे हे प्रमुख पाहुणे होते.
आजच्या काळात स्त्रियांना मिळालेल्या स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात नको असे आवाहन सावित्रीबाई उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी प्राचार्या मनोरमा शेळके-भवर यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा.मोहिनी शिंदे-चोंदे यांनी स्त्रियांच्या शिक्षणाबाबत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले शिक्षणासाठी केलेला संघर्ष आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त करून अध्यक्षीय समारोप केला.
या कार्यक्रमात भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने,विद्यालयातील सीमा चोरघडे,वैष्णवी सुरवसे,संचिता चोरघडे,साक्षी सोनवणे,श्रीकांत धाकतोडे,गोविंद वावरे,तुकाराम मिरगिणे,गिरीधर वावरे ह्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर काळे,प्रास्ताविक गिरीधर कवडे तर आभार सुप्रिया चव्हाण यांनी मानले.
याप्रसंगी भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्रा.श्रीकांत पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अविनाश घोडके,निदेशक सागर पालके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक विनोद जाधव,अतिश वाघमारे,विनोद कसबे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.