पत्रकार संघातर्फे आज वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार
उस्मानाबाद : दर्पण दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघातर्फे शुक्रवारी (दि. 6) वृत्तपत्र विक्रेते तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कौतुक सोहळा शासकीय विश्रामगृहात रंगणार आहे. यात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचाही गौरव केला जाणार आहे. शुक्रवारी दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यात प्रामुख्याने वृत्तपत्र विक्रेते, शहरातील सर्व पत्रकारांचा, पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा, उत्कृष्ट कार्याबद्दल कुटुंबातील सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यासोबतच आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या कलाकारांचाही सन्मान केला जाणार आहे.
यात प्रभाकर जगदाळे, बाळासाहेब गोरे, भारुडकार कृष्णाई उळेकर आदींचा यात समावेश आहे.
सर्वानी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सचिव भीमाशंकर वाघमारे यांच्यासह जी. बी. राजपूत, बालाजी निरफळ, सयाजी शेळके, अमोल गाडे, विकास सुर्डी, मच्छिंद्र कदम, बाबुराव चव्हाण, राकेश कुलकर्णी, कालिदास म्हेत्रे, देविदास पाठक, अनंत आडसूळ, कमलाकर कुलकर्णी, महेश पोतदार, रवींद्र केसकर, बाळासाहेब मुंदडा, संजय जहागिरदार, दिलीप पाठक नारीकर आदींनी केले आहे.
-------