दोन रेड्यां मध्ये पैश्यावर झुंज लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल
प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
भुम पोलीस ठाणे : भुम येथील- दत्ता गाढवे, ज्ञानेश्वर गाढवे, अनिकेत टिपे, अंगद भोसले, रामभाउ गाढवे यांनी दि.04.01.2023 रोजी 16.30 वा.सु. साबळेवाडी येथील मोकळ्या मैदनावर पाळीव प्राणी दोन रेड्यां मध्ये पैश्यावर निर्दयपणे बेकायदेशीर झुंज लावत असतांना भुम पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 (1) (द) सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (B) (C),क.119 म.पो.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.