मराठी चित्रपटात प्रधार्पण केलेल्या देशमुख कुटुंबियांना महाराष्ट्रातून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. पोटाच्या पहिल्या दिवशी चित्रपट प्रकाशित झाल्यानंतर रितेश देशमुख व जनेलिया देशमुख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे येऊन आई तुळजाभवानीची पूजा करून दर्शन घेऊन प्रार्थना केली होती.
रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. वेड सिनेमाने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. बॅाक्स ॲाफिसवर 'वेड' सिनेमाने अवघ्या ३ दिवसांत १३ कोटींचा गल्ला केल्यानंतर रितेशने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
#Riteish_Deshmukh #osmanabadnews #वेड


