google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 मराठवाडा शिक्षक मतदार संघ बाबत प्रतिष्ठान भवन धाराशिव येथे प्रतिष्ठान आढावा बैठक संपन्न

मराठवाडा शिक्षक मतदार संघ बाबत प्रतिष्ठान भवन धाराशिव येथे प्रतिष्ठान आढावा बैठक संपन्न

0

उस्मानाबाद :-  भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान भवन उस्मानाबाद येथे मराठवाडा शिक्षक मतदार संघ आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीस  संस्था प्रमुख,‍ कर्मचारी व इतर पदाधिकारी तसेच भाजप शिक्षक आघाडी व भाजपा संस्थाचालक आघाडी व इतर शिक्षक संघटनेचे व संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये सर्वप्रथम तुळजापूरचे विद्यमान आमदार तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे नेते आ. राणा जगजितसिंह पाटील यांची मराठवाडा शिक्षक मतदार संघ प्रचार प्रमुख व मराठवाड्याचे प्रभारी म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. सदर बैठकीमध्ये 12 तारखेला औरंगाबाद येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत नियोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीने मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार म्हणुन प्रा.किरण पाटील यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली आहे.




.त्याबाबत आज उस्मानाबाद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रा.किरण पाटील यांना सदर निवडणुकीमध्ये विजय मिळवुन देण्यासाठी सर्व संस्था चालक, कर्मचारी व पधादीकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी रामदास कोळगे प्रभाकर मुळे, आबदारे सर यांनी मार्गदर्शन केले . जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचे सर्व समावेषक नियोजनपूर्वक मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन संस्था चालक प्रमुख पांडुरंग लाटे सर यांनी केले व शेवटी शिक्षकांच्या समस्या मांडून प्राध्यापक विनोद राठोड यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top