उस्मानाबादेत ठाकरे सेनेला मध्ये खिंडार बाळासाहेबांच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांचा प्रवेश.

0

उस्मानाबादेत ठाकरे सेनेला मध्ये खिंडार बाळासाहेबांच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांचा प्रवेश.

उस्मानाबाद (प्रतिनिधी) :- काही दिवसांपूर्वीच उस्मानाबाद चे शिवसेनेचे सह जिल्हाप्रमुख अनिल खोचरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात ( शिंदे गटामध्ये ) प्रवेश केला होता. सेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याचे चित कुठे थांबत नसल्याचे चित्र सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिसत आहे.  निष्ठावंतांनी पक्ष त्याग सुरू केल्याने ठाकरे सेनेला भले मोठे खिंडार पडले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील 'अ' दर्जाची उस्मानाबाद नगरपालिका निवणुक जवळ आली असताना पालिका क्षेत्रातील शहराध्यक्ष यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शहरातील अजून किती जण शिंदे गटात जाणार असा प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहे.
 

        महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद चे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय (पप्पु) मुंडे,भीमा (आण्णा) जाधव प्रवीण (पिंटू) पवार, हरिदास शिंदे विजय मुंडे यांनी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी माजी नगरसेवक सनी पवार उपस्थित होते.

        ठाकरे सेनेला निष्ठावंत कार्यकर्त्याच्या प्रवेशाने मोठं खिंडार पडले आहे.
 निष्ठावंत कार्यकर्त्यांना ठाकरे सेनेमध्ये मानसन्मान मिळत नसल्याने  कार्यकर्त्यांची नाराजी वाढलेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात बाळासाहेबांचे शिवसेना शिंदे गट पक्षाला वाढता पाठिंबा दिसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक तसेच जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top