आयुष इन्स्टिटयूटच्या युवक महोत्सवातील विजेत्यांना शानदार सोहळ्यात बक्षीस वितरण
पुढील वर्षीपासून तीन दिवस महोत्सव घेण्याचा मानस - डॉ. संदीप तांबारे
जामगाव -
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विकेकानंद यांची जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नशामुक्त भारत अभियानांतर्गत आयोजित व्यसनमुक्ती युवक महोत्सवात घेण्यात आलेल्या शाळा, महाविद्यालयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्य, वक्तृत्व, चित्रकला, समूह व वैयक्तिक नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावर्षी एकदिवसीय महोत्सवाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून पुढील वर्षीपासून सलग तीन दिवस महोत्सव घेण्याचा मानस लाईफलाईन वेल्फेअर सोसायटीचे सीईओ डॉ. संदीप तांबारे यांनी व्यक्त केला.
युवक महोत्सवात राज्यभरातील शाळा, महाविद्यालयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बक्षीस वितरण सोहळ्यास लाईफलाईन वेल्फेअर सोसायटीचे सीईओ डॉ. संदीप तांबारे, यश मेडिकल फाउंडेशनच्या डॉ.सौ. पल्लवी तांबारे, सौ. सुमन तांबारे, माणिकराव तांबारे, बापूराव हुलुले, समुपदेशक सौ. मृणालिनी मोरे, समुपदेशक नितीन आळंदकर, डॉ. कविता अंधारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर उर्वरित स्पर्धक आणि संघाना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षक सौ. मृणालिनी मोरे, नृत्य स्पर्धेचे परीक्षक प्रसाद सहस्त्रबुद्धे, डॉ. कविता अंधारे, पथनाट्यचे परीक्षक संदीप ठोगे यांचाही सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात या आगळ्यावेगळ्या, सामाजिक संदेश देऊन जाणीवजागृती करणाऱ्या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल डॉ. तांबारे यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रुती जाधव, डॉ. तनुजा चिकणे यांनी केले. कार्यक्रमासाठी आयुष इन्स्टिटयूट, येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे सर्व समुपदेशक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
समूह नृत्य स्पर्धेतील विजेते :- सोजर इंग्लिश स्कुल बार्शी (प्रथम), माध्यमिक विद्यालय ममदापूर (व्दितीय), जि.प. शाळा वाणेवाडी (तृतीय), जि.प. शाळा जामगाव (चतुर्थ).
वैयक्तिक नृत्य स्पर्धेतील विजेते :- मानसी यादव, नागनाथ हायस्कुल घारी (प्रथम), ख़ुशी चव्हाण (व्दितीय).
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते :- खुला गट - संकेत पाटील, शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज (प्रथम), गणेश विरासे, भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी (व्दितीय), नितीन देशमुख (तृतीय). शालेय गट - प्रणाली धस तांदुळवाडी (प्रथम), प्रणिती धस (व्दितीय), युवराज गायकवाड जामगाव (तृतीय), निशिगंधा उपरे घारी (चतुर्थ), सायली जगदाळे (विशेष पुरस्कार).
चित्रकला स्पर्धेतील विजेते :- वृषभ बसवंत (प्रथम), गौरी जगताप (व्दितीय), समीक्षा बनसोडे (तृतीय), अमृता मुळे (चतुर्थ).
पथनाट्य स्पर्धेतील विजेते :- नागनाथ हायस्कुल घारी (प्रथम), जि.प. शाळा जामगाव (व्दितीय), आयुष टीम (विशेष सन्मान).