उस्मानाबाद पोलीसाची अवैध मद्य विरोधी कारवाई
उस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि. 13.01.2023 रोजी तेर येथे दोन ठिकाणी छापे टाकले. यात तेर येथील- धनवंत चौगुले हे 19.10 वा. सु. गावातील बस स्थानकाजवळ अंदाजे 4,230 ₹ किंमतीची 60 लि. गावठी दारु व देशी दारुच्या 09 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर पारधी पिढी, तेर येथील- राजा पवार हे 19.50 वा. सु. पिढीवर अंदाजे 2,700 ₹ किंमतीची 45 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले. तसेच पेठसांगवी, ता. उमरगा येथील- महादेव राठोड हे दि. 14.01.2023 रोजी 16.00 वा. सु. गावातील समुद्राळ रस्त्याकडेच्या एका झाडाखाली अंदाजे 880 ₹ किंमतीच्या देशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना लोहारा पोलीसांना आढळले.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.