लोकसेवकाचा आदेश डावलून आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा नोंद
उमरगा पोलीस ठाणे : सार्वजनिक ठिकाणी आंदोलन करण्यास मनाई असल्याचा लोकसेवकाचा आदेश असतानाही यशवंत भंडारे, रा. बेळंब यांनी प्रोत्साहन दिल्याने योगेश कडगंजे, विशाल गायकवाड, दोघे रा. उमरगा, करण रामपुरे, रा. बेळंब, रविंद्र कांबळे, रा. जकेकुर, अमित सुरवसे, रा. हिप्परगा या सर्वांनी दि. 13.01.2023 रोजी 12.30 ते 12.45 वा. दरम्यान उमरगा येथील राष्ट्रीय महामार्गावर अवैध जमाव जमवून रहदारी अडवली आणि सार्वजनिक शांततेचा भंग करुन रास्तारोको आंदोलन केले. यावरुन उमरगा पो.ठा. चे सपोनि- श्री. महेश क्षिरसागर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 143, 147, 188 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.