कल्याण मटका जुगार खेळताना पोलिसांचा छापा
कळंब :- उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांचे पथक कळंब उप विभागातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 30.1.2023 रोजी कळंब शहरात गस्तीस होते. पथकास गोपनीय माहिती मिळाली की, कळंब शहरातील होळकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेकरतच्या बाजूला काही इसम कल्याण मटका जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणी 16.00 ते 16.45 वा. सु. 2 ठिकाणी छापे टाकले असता तेथे 1. इरफान शेख 2. प्रशंत वेदपाठक 3. रहिम शेख 4.अमोल माने 5.गणेश माने 6.खंडेश्वर लोकरे 7. सतिष पाटोळे 8. मतिन मुढें सर्व रा.कळंब तर 1.आत्मिंग कथले 2. महादेव ओकसकर, 3. चंदर मुढें हे सर्व लोक कल्याण मटका जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. नमूद जुगार अड्ड्यावरुन कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम असा एकुण 2,18,656 ₹ किं चा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,6, 12(अ) अंतर्गत कळंब पो.ठा. येथे स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे ए.एस.पी.- श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांच्या पथकाने केली आहे.