google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंद पाटील यांना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख करण्याची सैनिकांची मागणी

आनंद पाटील यांना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख करण्याची सैनिकांची मागणी

0

आनंद पाटील यांना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख करण्याची सैनिकांची मागणी 

जिल्हाभरात वाढविला दांडगा जनसंपर्क

उस्मानाबाद दि.२ (प्रतिनिधी) - बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्ह्यात प्रस्थ वाढत असून हे प्रस्थ व युवकांची फळी उभ्या करण्यासाठी प्रयत्न करीत असलेले युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद सतीशराव पाटील यांच्यावर युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदाची कमान व धुरा सोपवावी, अशी मागणी जिल्हाभरातील शिवसैनिकांतून होऊ लागली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना चांगल्या पद्धतीने जनमानसात रुजू लागली आहे. तर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्याची चुणूक दिसून आली आहे. कारण १६६ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकला असल्यामुळे जिल्ह्यात पक्ष मोठ्या जोमाने वाढत चालला आहे. विशेष म्हणजे यामध्ये युवकांचा वाटा सर्वात मोठा असून यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद सतीशराव पाटील हे सतत सर्व पक्षांतील युवकांशी संपर्क साधून असल्यामुळे पुढील काळात त्यांच्या माध्यमातून युवकांची चांगली फळी पक्ष बांधणी व उभारणीसाठी होऊ शकते. कारण डिसेंबर महिन्यांमध्ये पाटील यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), आय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदी पक्षांमधील शेकडो युवकांचा राज्याचे कुटूंब कल्याण व सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करून जिल्ह्यात शिवसेना (बाळासाहेब) ला उभारी व पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचे काम केले आहे. कारण हा पक्ष प्रवेश सोहळा उस्मानाबाद जिल्ह्यात झाला नव्हता तर तो पुणे येथील कात्रज विभागात प्रा डॉ सावंत यांच्या संपर्क कार्यालयात मोठ्या थाटात केला होता. त्यासाठी उस्मानाबाद येथून मोठ्या प्रमाणात युवकांना चारचाकी वाहनांमध्ये नेले होते. त्यामुळे एका मागून एक निघालेल्या वाहनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आजपर्यंत अशा पद्धतीचा पक्षप्रवेश सोहळा झालेला नव्हता. तसेच उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पक्ष वाढविण्यासाठी आनंद पाटील हे सक्रिय होऊन व पायाला भिंगरी बांधून काम करीत आहेत.  विशेष म्हणजे त्यांनी पालकमंत्री डॉ सावंत यांचा विश्वास संपादन केला असून त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत हिरारीने व जीव ओतून ते पक्षाचे काम करीत आहेत. त्यांच्या या कामाच्या शैलीमुळेच पक्ष वाढीसाठी भविष्यात मोठा फायदा होणार आहे

आनंद पाटील यांनी पक्ष स्थापनेपासून संघटनात्मक काम करण्याचा आराखडा आखला असून तेव्हापासून ते सतत अनेकांच्या समस्या सोडवून त्यांची कामे करीत आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदचे सदस्य असताना त्यांनी ग्रामीण भागातून आलेल्या प्रत्येक नागरिकांची काम करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. त्यांना सर्वसामान्यांची अडलेली कामे कशा पद्धतीने करून घ्यायची व त्यासाठी काय करावे लागते ? याचा चांगला अनुभव आहे. तर त्यांचा दांडगा जनसंपर्क असून युवकांमध्ये त्यांनी आपल्या कामामुळे नवी क्रेझ निर्माण केली आहे. त्यामुळे ते युवकांच्या गळ्यातील तायीत बनत चालले असून त्यांना उस्मानाबाद-कळंब-तुळजापूर या विभागाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदी वर्णी लावावीच अशी जोरकसपणे युवक वर्गातून मागणी होऊ लागली आहे.


तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू केला तर प्रा. डॉ सावंत हेच सुरू करू शकतात. असे ५ वर्षाखाली आनंद पाटील यांनी सांगितले होते. तर आता हा कारखाना डॉ सावंत यांच्या भैरवनाथ शुगरकडे आला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात काम करण्याचा पाटील यांचा अधिक कल वाढला असल्यामुळे अनेक शेतकरी, युवक तसेच नागरिक त्यांच्याशी जोडू लागले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top