उस्मानाबाद येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

0

उस्मानाबाद येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी


बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी,  घोषणा, ब्लँकेट वाटपासह विविध कार्यक्रम

उस्मानाबाद -
हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सोमवारी (दि.23) उस्मानाबाद शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली  विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले. जयंतीनिमित्त फटाक्यांची जोरदार आतषबाजी करुन घोषणा देण्यात आल्या.

सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये आजही ज्यांच्या नावाने ऊर्जा निर्माण होते असे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमापूजनानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर गरजू नागरिकांना जिल्हाप्रमुखांच्या हस्ते उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख अजित लाकाळ,शहरप्रमुख सनी पवार संजय मुंडे, भीमा जाधव, येडशी उपसरपंच शशांक सस्ते, जयंत भोसले, कमलाकर दाने, पिंटू पवार, रजनीकांत माळाळे , राजाभाऊ पवार, कुणाल धोत्रीकर, सरपंच किरण लगदिवे, विशाल हिंगमिरे, हरिभाऊ शिंदे, विजय बारकुल, रणजीत चौधरी, अक्षय माळी, अजिंक्य आगलावे, संकेत हाजगुडे, सचिन मडके, बालाजी सूर्यवंशी, अतिश माने, नितीन देवकते, ज्ञानेश्वर ठवरे, रामेश्वर घोगरे, आबा देवकते, सुमित गायकवाड, ओमकार मैरान, स्नेहल माने, जयराम चव्हाण, सुरज राऊत, कृष्णा घोणे, अमर मडके, बबलू नवले, सचिन मडके, राहुल सुरवसे, सुनील काळे, अविनाश टापरे, व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भाजपा आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले पूजन
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी भाजपाचे जिल्हाप्रमुख नितीन काळे, अ‍ॅड. नितीन भोसले, युवा मोर्चा जिल्हाप्रमुख राजसिंह राजेनिंबाळकर, व इतर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top