०५ - औरंगाबाद विभाग पदवीधर शिक्षक मतदार संघ निवडणूक , उस्मानाबाद जिल्ह्यात ९२.३८ टक्के मतदान

0
०५ - औरंगाबाद विभाग पदवीधर शिक्षक मतदार संघ निवडणूक ,  उस्मानाबाद जिल्ह्यात ९२.३८ टक्के मतदान 


उस्मानाबाद,दि.30(जिमाका):-* भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज (दि. 30) मतदान झाले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे 92.38 टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला आहे.

             सकाळी आठला जिल्ह्यातील 25 मतदान केंद्रांवर शांततेत मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात जवळपास 11.14 टक्के मतदारांनी मतदान केले. तर दुपारी बारापर्यंत सुमारे 30.03 टक्के मतदान झाले. दुपारी दोन वाजता सुमारे 58.27 टक्के मतदानाच नोंद झाली होती. मतदानाचा कालावधी संपेपर्यंत म्हणजेच सायंकाळी चारपर्यंत जिल्ह्यात सुमारे 92.38 टक्के मतदान झाले.
                मतदार यादीनुसार जिल्ह्यात 4 हजार 254 पुरुष आणि 959 स्त्री असे एकूण 05 हजार 213 शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी 3 हजार 961 पुरुष आणि 855 स्त्री म्हणजेच एकूण सुमारे 4 हजार 816 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
                                   *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top