उस्मानाबाद शहरात चौकातुन सकाळी आठ वाजता अपहारण.
उस्मानाबाद शहरातील आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीत : अशोककुमार झाबरमल, वय 28 वर्षे, (मुळ रा. राजस्थान) सध्या रा. ठाकरेनगर उस्मानाबाद हे दि.02.02.2023 रोजी सकाळी 08.00 वा. छ.संभाजी चौकात उभे होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्कारपिओ वाहनातून आलेल्या चार व्यक्तींनी अशोककुमार यांना हात धरुन आपल्या वाहनात बसवून अज्ञात ठिकाणी नेउन त्यांचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या नातेवाईक कैलास कसाना, रा. ठाकरेनगर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं. कलम 34,365 अंतर्गत गुन्हा नोदंवला आहे. अशी माहिती उस्मानाबाद मुख्यालय येथुन देण्यात आली आहे.