उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी ७ ठिकाणी छापे टाकून कारवाई
जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि.02.02.2023 रोजी 7 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात घटनास्थळावरील जुगार साहित्यासह रक्कम असा एकुण 52,830 ₹ माल जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.
1)कळंब. च्या पथकाने कळंब शहरात 17.50 वा. दरम्यान छापा टाकला. यात जुनी दुध डेअरी, कळंब ग्रामस्थ- पिट्यां पवार हे जुनी दुध डेअरी कळंब येथे पप्पु प्लेइंग पिक्चर मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह बाळगलेले असताना आढळले.
2)आनंदनगर च्या पथकाने उस्मानाबाद शहरात 18.00 वा. दरम्यान छापा टाकला. यात परशुराम कॉलनी उस्मानाबाद ग्रामस्थ- बालाजी मंजुळे हे उस्मानाबाद येथे नगर परिषद समोर रोडलगत कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 660 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
3) उमरगा च्या पथकाने उमरगा पो ठा हद्दीत 16.50 ते 20.00 वा. दरम्यान चार छापे टाकले. यात नाईचाकुर, ता उमरगा ग्रामस्थ- दयानंद माने,महिंद्र कांबळे हे गावातील बागुले यांच्या घरासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 910 ₹ रक्कम बाळगलेले, तर उमरगा येथील- सतिष लगुटे, खंडू सगर, तर बसवकल्याण येथील- शांतीवीर डोळे, नरेश बत्तेनवार, तर धाकटीवाडी ता. उमरगा येथील- किसन जाधव हे पाचजण धाकटीवाडी शिवारात आर टी ओ ऑफीस जवळ पत्रा शेड मध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 50,720 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
4) ढोकी च्या पथकाने ढोकी पो.ठा. हद्दीत 14.15 वा. दरम्यान छापा टाकला. यात कोंड, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- वैजीनाथ रोडगे हे कोंड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 540 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबधीत पो.ठा. येथे स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. अशी माहिती उस्मानाबाद पोलीसांनी दिली आहे.