राजापूर , अचलपूर येथील आरोग्याच्या विभागाच्या संदर्भात आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांची बैठक संपन्न

0

राजापूर , अचलपूर येथील आरोग्याच्या विभागाच्या संदर्भात आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांची बैठक संपन्न

मुंबई : विधानसभेतील माजी मंत्री बच्चुभाऊ कडू व आमदार राजनजी साळवी यांच्या मतदारसंघातील आरोग्य विभागाशी निगडित विविध प्रश्नांबाबत आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत उपस्थित दालनात बैठक पार पडली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बच्चु भाऊ कडू यांच्या अचलपूर विधानसभा क्षेत्रातील विविध आरोग्य विषयक मुद्यांवर यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, विविध रुग्णालयातील खाटांचे श्रेणीवर्धन तसेच इतर आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश संबंधिताना देण्यात आले.

राजनजी साळवी यांच्या मतदारसंघातील राजापूर तालुक्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणे बाबत, तसेच मतदारसंघातील आरोग्य संस्थांमधील रिक्त पदे भरणे बाबत व इतर प्रश्न व अडचणी संदर्भात उपाय योजना करण्याचे आदेश संबंधिताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top