परंडा :-
मौजे ढगपिंपरी गावच्या हद्दीतील चांदणी नदीपात्रातील वाळू उत्खनन करण्याचा लिलाव तक्रारदार यास मिळाला असून सदर वाळू घाटावर पाहण्यासाठी ग्राम दक्षता समिती नेमण्यात आली होती, सदर समितीचे सदस्य हरिदास लिंबाजी हावळे पोलीस पाटील ढगपिंपरी तालुका परंडा हे असून त्यांनी तक्रारदार यास तुम्ही नियमबाह्य वाळू उत्खन करताय त्याचे फोटो काढून महसुल वीभागाला पाठवतो आणि तक्रार करतो असे सांगून फोटो काढून महसूल विभागाला तक्रार न करण्यासाठी पंचा समक्ष यापूर्वी दोन लाख रुपये लाच मागितल्याचे मान्य करून दिनांक 9 मार्च 2023 रोजी 70 हजार रुपये लाचेची मागणी करून दिनांक 24 मार्च 2023 रोजी 70 हजार रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वीकारल्याने आरोपीस ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन परंडा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, सदरील कारवाई ही संदीप आटोळे पोलीस अधीक्षक लाच प्र. वि. औरंगाबाद, विशाल खांबे अप्पर पोलीस अधीक्षक ला. प्र.वी. औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धाराम म्हेत्रे पोलीस उप अधीक्षक ला. प्र.वी. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक हुलगे पोलीस निरीक्षक ला. प्र.वी. उस्मानाबाद पोलीस आमदार विष्णू बेळे सिद्धेश्वर तावस्कर अविनाश आचार्य चालक दत्तात्रय करडे यांच्या पथकाने केली आहे. लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर 02472 222879 आणि टोल फ्री क्रमांक 10 64 यावरती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.