वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम बँचने
घेतली जबाबदारीची प्रतिज्ञा
उस्मानाबाद,दि.15 ( सलीम पठाण ): शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशीत प्रथम बॅच मधील 100 एमबीबीएस विद्यार्थ्यांचा White Coat Ceremony-Rite of Passage हा कार्यक्रम 13 मार्च रोजी संपन्न झाला. या समारंभात विद्यार्थ्यांना एप्रन देऊन,WHO-Geneva Conventhon प्रमाणे विद्यार्थी प्रतिज्ञा देण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी पुढे चालून ते जबाबदार,कुशल व नैतिकता राखणारे डॉक्टर होतील, असे वचन घेतले.
वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे लाभले. संस्था प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सामजंस्य करारानुसार जिल्हा रुग्णालयातील अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी विद्यार्थी व प्रशासनास मोलाचे मार्गदर्शन केले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना समारंभाच्या उद्देशाबाबत व पुढील मार्गक्रमणासाठी समोपदेशन व मार्गदर्शन केले, तर डॉ. प्रविण डुमणे यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली.
****