आरोग्य मंत्री सावंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी पारगाव येथे साजरा

0

आरोग्य मंत्री सावंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी पारगाव येथे साजरा

वाशी दि.१५ (प्रतिनिधी) - तालुक्यातील पारगांव येथे राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. 
वाशी तालुक्यातील पारगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पंचायत समितीच्या माजी सदस्य सविता विकास तळेकर यांनी वॉटर फिल्टर भेट दिला. तर स्त्री जन्माचे स्वागत म्हणून मागील ४ वर्षांपासून पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मुलीचा जन्म झाल्याच्या नंतर मुलींना चांदीचे पैंजण भेट देण्यात येते. हा उपक्रम यापुढेही चालू राहणार असल्याची घोषणा करून नुकत्याच जन्मलेल्या मुलींना चांदीचे पैंजण भेट देण्यात आले. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून पारगाव परिसरातील सुजाता आहिरे, माया आहिरे, शितल कुदळे, आशाबाई गावडे, निर्मला कोकने, शालन पवार, सतुबाई घुले, शितल इंगळे, पवार, वर्षा आखाडे या १० कर्तुत्ववान महिलांचा शाल सन्मानचिन्ह व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी रक्तदान शिबिर, सर्व रोग निदान शिबिर, डोळे तपासणी व चष्मे वाटप आदी कार्यक्रम घेण्यात होते. यावेळी या रक्तदान शिबिरामध्ये ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी डीसीसी बँकेचे कार्यकारी संचालक व भैरवनाथ शुगर मिलचे कार्यकारी संचालक केशव सावंत, वाशी तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, युवा सेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, युवा तालुका अधिकारी प्रवीण गायकवाड, शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर, पारगाव सर्कल प्रमुख बंडू खोसे, भाजपा उपजिल्हाध्यक्ष महादेव आखाडे,  तालुका अध्यक्ष सचिन इंगोले, अशोक जाधव, लाखनगावचे सरपंच अशोक लाखे, हातोल्याचे उपसरपंच विलास खवले, सरमकुंडीचे सरपंच दिनकर शिंदे,  पिंपळगावचे उपसरपंच राजाभाऊ जोगदंड, प्रकाश पाटील, पारगाव ग्रामपंचायत सदस्य राजा कोळी, तानाजी कोकाटे, भाऊसाहेब उंद्रे, सुदर्शन नारटा, दत्ता जाधव, राहुल आडमुटे, अमोल खोटे, संतोष घुले, माधव बहिर, बाबासाहेब हारे, महेश कोकणे, लिंबराज वायसे, बाबासाहेब आटोळे, किशोर आखाडे, मुजमील पठाण, संभाजी मुळे, दत्ता मुळे, महेश गिराम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रिया मोटे, डॉ अमित खुने आदींसह सर्व वैद्यकीय कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top