पालकमंत्री सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर ,
व्यसन बहादरांकडून केला दंड वसूल
उस्मानाबाद दि.१५ (प्रतिनिधी) - राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त येथील स्त्री रुग्णालयामध्ये आरोग्य शिबीराचे आयोजन दि.१५ मार्च रोजी करण्यात आले. या आरोग्य शिबीरामध्ये महिलांचे बीपी, शुगरची तपासणी करण्यात आली. तर रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना आरोग्य विषयक माहिती सांगण्यात आली. विशेष म्हणजे तंबाखू, गुटखा व सिगारेट याचे दुष्परिणाम या विषयी माहिती देऊन ज्यांनी धूम्रपान केले. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. यावेळी स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता गवळी-सरोदे यांनी महिलांमध्ये वाढत असलेल्या गर्भाशय कॅन्सरची तपासणी करून घेऊन लवकरात लवकर उपचार करून घ्यावेत असे सांगितले. या आरोग्य शिबीरामध्ये ५४ महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५ सिझर तर २ नॉर्मल प्रसूती करण्यात आली. तसेच २१ महिलांची सोनोग्राफी तपासणी करण्यात आली. यावेळी एनसीडी कार्यक्रम अधिकारी डॉ.विक्रांत राठोड, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अभिजित संघई, मेट्रन भंडारी, एनसीडी समुपदेशक प्रदीप तटाळे, रजनी इंगळे, रुपाली खुने व आशा चव्हाण आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.