पाणीपुरवठ्याची वीज तोडल्यामुळे शहरात तीन दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
उस्मानाबाद : ( संपादक : सलीम पठाण ) उस्मानाबाद नगरपालिका पाणीपुरवठ्याची वीज तोडल्यामुळे गेल्या ३ दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला. शहरातील पाणी वितरण पुन्हा खोळंबा पडला आहे. शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्या भटकंती करावी लागत आहे. नगरपालिकेकडून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून वीज वितरण चे पैसे भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही व अशी माहिती पाणीपुरवठा विभागातून देण्यात आली आहे व ही वीज वितरण चे बिल भरण्याची प्रक्रिया कधीपर्यंत होईल हे देखील स्पष्ट सांगण्यात येत नाही. मागील काही पुर्वी शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता त्यावेळी अनेक राजकीय पक्षांनी नेत्यांनी आमच्यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे 'श्रेय' घेतले होते मात्र आता पुन्हा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा नागरिकांना दिलासा द्यावा ज्याला पाण्याचे 'श्रेय' घ्यायचा आहे त्यांनी घ्यावे असे मत नागरिकांतून मत व्यक्त होत आहे.
नगरपालिकेकडे महावितरणची पाच कोटींपेक्षाही अधिक थकबाकी आहे. यामध्ये पाणीपुरवठ्याचीही बाकी मोठ्याप्रमाणात आहे. यामुळे महावितरणकडून वीजबील वसूलीसाठी सातत्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात येत आहे. गेल्याच महिन्यात पुरवठा खंडित केल्यानंतर ३० लाख रुपये बील भरण्यात आले होते. आता पुन्हा वीज तोडण्यात आली आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक भागात पाणीच येऊ शकलेले नाही. यामुळे नागरिकांना ऐन सना सुधीच्या वेळी मोठी गैरसोय सहन करावी लागली. आता रमझान महिन्यातील उपवासही सुरू होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शहराचा पाणीपुरवठा नियमित खंडित होत आहे. पालिकेत प्रशासक अधिकारी असताना शिवसेना-भाजप (राज्यात-शिंदे) फडणवीस सरकार असताना नेहमीच पाणीपुरवठा खंडित झाल्याने याचे नागरिकांचे मत परिवर्तन करण्यासाठी विरोधकांना येणाऱ्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी याकडे लक्ष देऊन शहरवासीयांना दिलासा द्यावा अशी इच्छा 'उस्मानाबाद न्यूज' बोलताना शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.