राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी अभूतपूर्व असा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला असून समाजातील प्रत्येक घटकाला सर्वार्थाने न्याय दिला आहे. त्यांनी अर्थसंकल्पात केवळ घोषणाच केल्या नसून त्यावर कृती करण्यास देखील सुरुवात केली आहे. अर्थसंकल्पातील प्रत्येक बाबींवर काम करण्यात येणार असून फेब्रुवारी २०२४ मध्ये केलेल्या कामाचा कृती आराखडा ते जनतेसमोर मांडणार आहेत. त्यामुळे याबाबतची माहिती जन सामान्यांपर्यंत पोहोंचविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते व कार्यकर्ते जाऊन या महाबजेटची माहिती देणार असून यासाठी 'महाबजेट आपल्यासाठी' ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कोंड ता. जि. धाराशिव येथे बोलताना केले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या घरात पैसे आल्यानंतरच ग्रामीण अर्थव्यवस्था चालते. शेतकरीच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो. मात्र त्यांना निसर्गावरती अवलंबून राहावं लागतं. ना. देवेंद्रजी यांनी शेतकाऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा, केंद्र सरकार प्रमाणे रु ६००० सन्मान निधीची घोषणा केली आहे. विविध समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विकास महामंडळांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत वैद्यकीय खर्चाची मर्यादा 1.50 लाखाहून 5 लाखापर्यंत वाढविली.
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योजकांना कर्जावर ३५% अनुदान दिले जाते. यावर्षी जिल्ह्यात ६५० पेक्षा जास्त उद्योग व्यवसाय या माध्यमातून सुरू झाले आहेत. अशा योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केले. शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. स्मार्ट योजनेच्या माध्यमातून जवळपास २ कोटी अनुदान असणारे प्रकल्प जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहेत. या योजनेतून वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करता येतात. आपल्या एका जिल्ह्यात ३२ प्रकल्प मंजूर करण्याचे उद्दिष्ट्य केंद्र व राज्य सरकारने दिले आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक उद्योग सुरू झालेले दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. नितिन काळे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकार देणारे सरकार असून केवळ शेतकरीच नाही तर निराधार, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांच्या मानधनामध्ये वाढ केली. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, रेल्वे प्रकल्पासाठी निधी दिला, मेडिकल कॉलेज साठी निधी दिला. हे बजेट सर्वसामान्यांच सर्वसमावेशक बजेट असून शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा घेऊन जाणार असल्याच ते म्हणाले. जि प सदस्या उषा येरकळ यांनी गावात झालेली व सुरु असलेल्या विकास कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड रामेश्वर शेटे यांनी केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी उपसरपंच रामेश्वर शेटे, माजी सरपंच सिद्धेश्वर शेटे, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे, तालुकाध्यक्षा उषाताई येरकळ (सर्जे), भाजपा गट प्रमुख बाळासाहेब खांडेकर, मा.जि.प.सदस्य चंद्रकांत गुरव, ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव, किशोर सर्जे, नितळीचे उपसरपंच सदाशिव साखरे, संगमेश्वर स्वामी, नीलकंठ पाटील, दादा क्षीरसागर, बाळू गिरी, इरशाद मुलाणी, पत्रकार हुकूमत मुलाणी, विष्णू लोंढे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.