पालकमंत्री यांची घोषणा: तुळजापूर व परांडातील तक्रारदार शेतकऱ्यांची पुन्हा संयुक्त मोजणी करणार

0

पालकमंत्री यांची घोषणा: तुळजापूर व परांडातील तक्रारदार शेतकऱ्यांची पुन्हा संयुक्त मोजणी करणार

उस्मानाबाद : सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेल्या तीन महिन्यापासून मनमानी पद्धतीचे व दमदाठीचे भूसंपादन होत आहे शेतकऱ्याला त्याच्यात योग्य न्याय मिळवून द्यावा आणि राजकुमार माने भूसंपादन अधिकाऱ्यांची बदली करावी अशा आशयाचे समितीमार्फत शेकडो पत्रे भूसंपादन कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय तसेच माननीय पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने तुळजापूर तालुक्यातील अकरा गावे व परंडा तालुक्यातील 21 गावे अशी भूसंपादन प्रक्रिया चालू होती त्यामध्ये संपूर्ण तुळजापूर तालुक्यातील भूसंपादन प्रक्रियेची थ्रीडी ची अधिसूचना निघाली होती तसेच परंडा तालुक्यातील पाच गावाची थ्रीडीची अधिसूचना निघाली होती यामध्ये दोन्ही तालुक्यातून शेकडो शेतकऱ्यांची भूसंपादन प्रक्रिया मनमानी पद्धतीने व पोलीस फोर्स वापरून केलेल्या अशा आशयाच्या तक्रारी माननीय पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्याकडे होत्या त्यामध्ये मध्यंतरी 26 जानेवारी रोजी सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे संघर्ष समितीचे महारुद्र जाधव यांनी रीतसर तक्रारीची नोंद केली होती त्यामध्ये तात्काळ पालकमंत्री माननीय तानाजी सावंत साहेबांनी निर्णय घेऊन भूसंपादन क्रमांक दोन चा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे चा पदभार दुसरीकडे देण्यात यावा व त्या जागेवरचे राजकुमार माने हे भूसंपादन अधिकारी तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले होते
परंतु सदर दोन्ही तालुक्यातील भूसंपादन प्रक्रिया ऑफिशियली चुकीची झालेली होती परंतु त्याची पुढील कार्यवाही सुरू होती त्या संदर्भामध्ये आज पालकमंत्र्यांनी उस्मानाबाद येथे रीतसर सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन सदर भूसंपादन प्रक्रियेमध्ये शेकडो शेतकऱ्यांचे अर्ज असल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला होता त्याच्यावर माननीय पालकमंत्री यांनी सदर विषयांमध्ये गांभीर्याने लक्ष घालून आज जिल्हाधिकारी यांना आदेश दिले की मागील भूसंपादन अधिकारी राजकुमार माने यांचा आपण पदभार काढून घेतलेला होता त्यानंतर त्यांच्या कार्यकाला मध्ये झालेली भूसंपादन प्रक्रिया सर्वश्री रद्द ठरवण्यात यावी असे आदेश देण्यात आले त्यानंतर नवीन आलेले भूसंपादन अधिकारी श्रीयोद करमाटे साहेब उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे पदभार सपोर्ट करून शेतकऱ्यांना असे सांगितले की यापुढे सर्व गावांमध्ये मोजणीची तारीख अगोदर डिक्लेअर केली जाईल गावामध्ये दवंडी दिली जाईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला नोटीस काढून शेतकऱ्याला विश्वासात घेऊन पुनश्च भूसंपादन प्रक्रिया राबवली जाईल त्याचबरोबर तालुक्यातील अनेक गावच्या शेतकऱ्यांची शेतजमीन बागायत असून जिरायत दाखवण्यात आली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी होत्या त्या संदर्भामध्ये सर्व अडचणी दूर करण्याचे आदेश भूसंपादन अधिकारी व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले सदरप्रसंगी चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेचे दोन्ही तालुक्यातील अंदाजे पाचशे शेतकरी सदर बैठकीसाठी उपस्थित होते अनेक शेतकरी शंभर ते दीडशे किलोमीटरचा प्रवास करून तळमळीने या बैठकीसाठी आलेले असताना पालकमंत्री यांनी सदर घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांनी अभिनंदन व धन्यवाद व्यक्त केले तसेच यापुढे शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचे सरकार ठामपणे उभे राहणार अशी ग्वाही पालकमंत्री दिली व त्यांच्या वतीने माननीय दत्तांना साळुंखे यांनी कुठल्याही शेतकऱ्यांची उपेक्षा होणार नाही याचा शब्द दिला याप्रसंगी तुळजापूरचे कृष्णा इंगळे काढ गावचे बाळू पवार समीर पठाण समीर पटेल बापू साळुंखे गणेश जाधव गहिनीनाथ हिवरे दत्तात्रेय मोरे साबिर शेख विकास चोबे सोमनाथ जाधव राम शेंडगे ब्रह्मदेव जाधव किशोर जाधव शाहीर जाधव गणेश जाधव श्रीकांत जोशी असे दोन्ही तालुक्यातून शेकडो शेतकरी उपस्थित होते सर्व शेतकऱ्यांनी पालकमंत्र्याचे आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top