जल जीवन मिशन अंतर्गत १२४ कोटी रुपयांच्या माकणी व १५ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न
लोहारा/प्रतिनिधी
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून माकणी ते जेवळी व १५ गावे पाणी पुरवठा योजनेसाठी जल जीवन मिशन अंतर्गत १२४ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असून दि.२७ मार्च २०२३ रोजी सदर कामाचे भूमिपूजन जेवळी येथील गुरुसिद्धेश्वर विरक्त मठाचे गुरु गंगाधर महास्वामीजी व आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. ज्ञानराज चौगुले होते. केंद्र शासन व राज्य शासन यांचा समान हिस्सा असलेल्या सदर योजनेत लोहारा तालुक्यातील जेवळी, माकणी, होळी, सालेगाव, सास्तूर, तावशीगड, जेवळी दक्षिण, भोसगा, व उमरगा तालुक्यातील बलसूर, एकुरगा, जवळगा बेट, कलदेव निंबाळा, माडज, नाईचाकूर, नारंगवाडी, पेठसांगवी अशा एकुण १६ गावांचा समावेश आहे. सदर कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, जेवळीच्या सरपंच सौ.महानंदा मोहन पणुरे, उपसरपंच बसवराज कारभारी, ह.भ.प. चंद्रकांत ढोबळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अधिकारी ए.पी.खरोसेकर, शाखा अभियंता बन्सी चव्हाण, श्यामसुंदर पाटील, पंडित पाटील, मनोहर माळी, बाळासाहेब देशपांडे, परवेज तांबोळी, सरपंच कास्ती बु., सागर पाटील, सरपंच कास्ती खु., वैभव पवार, सरपंच माळेगाव, महादेव कारले, उपसरपंच पांढरी, श्रीशैल ओवांडे, लोहारा नगर पंचायत शिवसेना गटनेते अभिमान खराडे, आयुब शेख, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत जेवळी ग्रामपंचायतीतील सदस्य, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.