भाजपा युवा मोर्चाचे राज निकम यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश

0

भाजपा युवा मोर्चाचे राज निकम यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश

उस्मानाबाद -
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव राज निकम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.

आ. कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आमदार कैलास पाटील यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.  शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट कराल, असा विश्वास आ. कैलास पाटील यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे युवा नेते दिनेश दत्ता बंडगर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी शाम जाधव , सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, अण्णा तनमोर, संग्राम देशमुख, दीपक जाधव, प्रवीण कोकाटे, मनोहर धोंगडे, निलेश शिंदे, प्रशांत बोंदर, किशोर साळुंके, संभाजी फरताडे, अजय नाईकवाडी, सुरज लोंढे, महेश लिमये, अजय विचुरे, सुधीर अलकुंटे, अतिक सय्यद उपस्थित होते.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top