अनोळखी मयत इसमाची माहिती देण्याचे तुळजापूर पोलिस ठाण्याचे आवाहन

0
अनोळखी मयत इसमाची माहिती देण्याचे तुळजापूर पोलिस ठाण्याचे आवाहन 

         उस्मानाबाद,दि.26( प्रतिनिधी ):- अनोळखी मयत इसमास प्रथम उपचाराकरिता दि.18 एप्रिल 2023 रोजी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात नगर परिषद कर्मचाऱ्यांनी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी केले असता तो व्यक्ती मयत असल्याचे घोषित केले आहे. त्यानुसार तुळजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्या मयत इतसमाची आजपर्यंत ओळख पटलेली नाही. मयत इसमाचे प्रेत हे त्यांचे नातेवाईकांचा शोध घेवून त्यांच्या ताब्यात देण्यासाठी उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयातील शवगृहात राखून ठेवलेले आहे.

             मयत इसमाचे अंदाजित वय 45 वर्षे असून उंची अंदाजे 163 सें.मी.आहे. रंग गोरा, सडपातळ बांधा, उभट चेहरा, सरळ नाक, दाढी थोडी वाढलेली काही केस काळे व पांढरे झालेले, छातीवर डाव्या बाजूस तीळ, अंगावरती लाल-पांढरा-निळ्या रंगाचा फुल बाह्याचा चेक्सचा शर्ट ज्याचे कॉलरवर ZEST कंपनीचा आणि अंगात निळसर रंगाची पॅन्ट जिच्या समोरील बाजूस खिशावर निळसर रंगांमध्ये लोगो, उजव्या हातांमध्ये प्लास्टिकची पिवळ्या रंगाची पट्टी असलेली तसेच त्याच्या गळ्यात निळसर रंगाचे मध्यम व लहान रंगाचे मनी असलेल्या दोन माळा आहेत. अशा वर्नणाची व्यक्ती कोणास माहित असेल तर पोलिस ठाणे तुळजापूर (02471-242028), पोलिस नियंत्रण कक्ष उस्मानाबाद (02472-22700-900), तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (9823142632) आणि तुळजापूर पोलिस तपासिक अंमलदार (9421874794) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तुळजापूर पोलिस ठाणे यांनी केले आहे.
 
                                           *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top