उस्मानाबाद दि.२९ (प्रतिनिधी) - खास पत्रकारांच्या विविध समस्यांना न्याय देण्यासाठी कार्य करीत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या बीड येथील विभागीय अधिवेशनास उस्मानाबाद जिल्ह्यातील दोनशे पत्रकार जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी दिली आहे.
व्हाईस ऑफ मीडिया ही देशपातळीवरील २० नामांकित संपादकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली पत्रकार संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांची घरे पत्रकारांची आरोग्य पत्रकारांच्या निवृत्तीनंतरचे प्रश्न पत्रकारांच्या पाल्यांचे शैक्षणिक व निर्यात अपडेट होणारे नवीन तंत्रज्ञान याबाबत पत्रकारांसाठी काम करीत आहे. या संघटनेच्या माध्यमातून देशातील विविध भागांमध्ये अधिवेशने घेण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील विदर्भातील चंद्रपूर येथे या संघटनेचे पहिले विभागीय अधिवेशन घेण्यात आले. तर दुसरे अधिवेशन मराठवाड्यातील बीड येथे दि.३० एप्रिल रोजी होणार असून धाराशिव जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियातील दोनशे पत्रकार जाणार आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटन खा प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खा इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती हारुण नकवी हे पहिल्या सत्रात उपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या सत्रामध्ये व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे राज्याध्यक्ष अनिल म्हस्के, इलेक्ट्रॉनिक विंगचे राज्याध्यक्ष विलास बडे, राष्ट्रीय कार्यवाहक शंतनू डोईफोडे, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, साप्ताहिक विंगचे राज्याध्यक्ष विनोद बोरे, डिजिटल विंगचे जयपाल गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच समारोप सत्रासाठी आ. धनंजय मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे, भारत सरकारच्या आरोग्य विभागाचे महाआरोग्य दूत तथा सहाय्यक सचिव ओमप्रकाश शेटे आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती बनसोडे यांनी दिली.