उस्मानाबाद जिल्ह्यातील अवकाळी पाऊस गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा-डॉ.प्रतापसिंह पाटील यांची कृषिमंत्र्याकडे मागणी
उस्मानाबाद (प्रतिनिधी) कळंब, उस्मानाबाद तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत व त्यांना मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा,ताकवीकी, धारूर,बामणी वाडी तसेच कळंब तालुक्यातील शिराढोण, नायगांव,आवाड शिरपुरा,सौंदाणा आंबा,रांजणी, पिंपरी,घारगाव आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे.
कळंब व उस्मानाबाद तालुक्यातील अनेक गावात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गहू,ज्वारी, कांदा,टोमॅटो,मिरची,फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी ई-मेल निवेदनाच्या माध्यमातून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.