पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या वतीने येडेश्वरी यात्रेत महाप्रसाद; हजारो भक्तांनी घेतला लाभ

0

पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या वतीने येडेश्वरी यात्रेत महाप्रसाद; हजारो भक्तांनी घेतला लाभ

उस्मानाबाद -
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या भक्तांसाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वतीने शुक्रवारी (दि.7) महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, दत्ता साळुंके व इतर मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला. दिवसभरात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 

येरमाळा येथे चैत्र पौर्णिमा यात्रेला प्रारंभ झाला असून शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती. देवीच्या पालखी मिरवणुकीनंतर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वतीने भाविकांना महाप्रसाद वाटप करुन देवीचरणी सेवा अर्पण करण्यात आली. तसेच उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन थंड मठ्ठा भाविकांना वाटप करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके,जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभरात हजारो भाविकांनी महाप्रसादाच्या या सेवेचा लाभ घेतला.

यावेळी शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top