मुरुम : शहरात जागतिक आरोग्य दिन साजरा सुंदर माझा दवाखाना या मोहिमेची सुरुवात सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा,सर्वांसाठी आरोग्य" सार्वजनिक आरोग्य विभाग..महाराष्ट्र शासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या संकल्पनेतील "सुंदर माझा दवाखाना" दि.०७.०४.२०२३ ते १४.०४.२०२३ या मोहिमेचा आज दि. ०७.०४.२०२३ रोजी आमदार मा.श्री.ज्ञानराजजी चौगुले , किरणजी गायकवाड ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय,मुरुम येथे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सत्यजित डुकरे साहेब तसेच युवासेना शहर प्रमुख, मा.भगत माळी,व त्यांचे सहकारी उमाकांत जाधव, सतिश चौधरी, जयदीप अंबर यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय मुरुम येथे "सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य" हे ध्येय समोर ठेऊन "सुंदर माझा दवाखाना" ही संकल्पना मनी धरून संपुर्ण दवाखान्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी सेवक आदी उपस्थित होते