मुंबई / प्रतिनिधी
कोविड चा नवीन व्हेरियंट व होत असलेली रुग्णाची वाढ या बाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडवीयजी यांनी आज सर्व राज्यांचे आरोग्यमंत्री यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला व करावयाच्या उपायोजनाबाबत माहिती दिली .
ट्रेकिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट यावर भर देण्यात यावा, आरटीपीसीआर तपासणी मध्ये वाढ करावी तसेच सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवून तयारी अद्यावत करावी, नवीन व्हेरियंट हा सौम्य स्वरूपाचा असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही परंतु धोके टाळण्यासाठी सर्व राज्यांनी काळजी घ्यावी व कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करावे या वर भर द्यावा तसेच जिनोम सिक्वेझिंग मध्ये सनियंत्रण करावे अश्या सूचना या वेळी करण्यात आल्या.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत उपस्थित होते. आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांनी महाराष्ट्रात देखील याबाबत खबरदारी घेण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.
राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
कोवीड 19 चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून देखील वेळोवेळी मदत, सहकार्य करण्यात येईल असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मंडवीयाजी यांनी सांगितले.