उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी ४ ठिकाणी कारवाई
नळदुर्ग् पोलीस ठाणे : जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.03.05.2023 रोजी 13.00 वा. सु. नळदुर्ग पो.ठा.हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी बसस्थानक नळदुर्ग ता. तुळजापुर येथील- अलीम रियाज अहमद कुरेशी, जमीन मेहबुब अडचणे, मोहमंदअली राजाखॉ पठाण् हे तिघे सलगरा, बसस्थानक नळदुर्ग येथे कल्याण नावाचा मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 29,990 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.
आनंदनगर पोलीस ठाणे : जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंद नगर पोलीसांनी दि.03.05.2023 रोजी 19.00 वा. सु. पो.ठा.हद्दीत छापे टाकला . यावेळी न.प. उस्मानाबाद समोरील पानटपरी ता. उस्मानाबाद येथील- समीर हबीब तांबोळी हे न.प. उस्मानाबाद समोरील टपरीमध्ये येथे मिलन डे नावाचा मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1240 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.
उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे : जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद ग्रामीण पोलीसांनी दि.03.05.2023 रोजी 19.00 वा. सु. पो.ठा.हद्दीत छापे टाकला . यावेळी येडशी ता. उस्मानाबाद येथील- सुनिल भगवान वाघमारे हे येडशी बसस्थानक समोर येथे मुंबई नावाचा मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 2180 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.
येरमाळा पोलीस ठाणे : जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.03.05.2023 रोजी 20.45 वा. सु. पो.ठा.हद्दीत छापे टाकला . यावेळी येरमाळा ता. उस्मानाबाद येथील- धम्मपाल देवर्शी वाघमारे हे भुमी हॉटेलचे पाठीमागे येथे मिलन नाईट नावाचा मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 640 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबधीत पोठा हद्दीत स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवलेले आहेत.