भुम डेपोच्या बसचा अपघात, देवगाव-भांडगावनजीक बस पलटी, ५ ते ७ जण जखमी , Bhum Dep's bus accident

0

भुम डेपोच्या बसचा अपघात, देवगाव-भांडगावनजीक बस पलटी, ५ ते ७ जण जखमी , Bhum Dep's bus accident

Solapur - जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील देवगावजवळ ( osmanabad जिल्ह्यातील ) भुम डेपोच्या बसला अपघात झाला असून भांडगाव-देवगावच्यामध्ये एका शेताजवळ दुपारी 2 च्या सुमारास बस पलटी झाली. बसमधील ७ ते ८ प्रवाशी जखमी झाले असून काहींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर काही वेळात १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली होती. दरम्यान, ही बस बार्शीहून भूमला जात असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. यासंदर्भात प्रशासनालाही माहिती देण्यात आल्याचे माहिती‌‌.





ग्रामीण भागात एसटी महामंडळाच्या धावणाऱ्या गाड्यांचे ऑडिट करणे आता गरजेचं बनलं आहे. येथे अनेक गाड्या खिळखिळ्या अवस्थेत असतानाही प्रवाशांनी भरुन गावदौरे करतात. त्यामुळे, चालक-वाहक यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. तर, प्रवाशांच्या जीवाशीही एकप्रकारे हा खेळच असल्याची ओरड प्रवाशांची आहे. आगार व्यवस्थापक याकडे लक्ष देतील का?, लोकप्रतिनिधीही याकडे गांभीर्याने पाहतील का, हाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top