राष्ट्रकुल स्पर्धा-२०२२ व जागतिक नेमबाजी स्पर्धा-२०२२” स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांच्या रोख पारितोषिक रक्कमेत वाढ

0

राष्ट्रकुल स्पर्धा-२०२२ व जागतिक नेमबाजी स्पर्धा-२०२२ स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांच्या रोख पारितोषिक रक्कमेत वाढ

 

Osmanabad  : दि.27(जिमाका):- राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्‍याच्या दृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत, यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळाडूच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडूचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख या बाबी विचारात घेऊन क्रीडा धोरण 2012 तयार करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, 2012 अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी तसेच राज्याचे नाव उज्वल करुन पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्याची योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वित असून त्याअंतर्गत‍ दि.28 जुलै ते 8 ऑगस्ट, 2022 या कालावधीत बर्मिंगहॅम-इंग्लंड येथे संपन्न झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील पदक प्राप्त 7 खेळाडू आणि त्यांचे क्रीडा मार्गदर्शक तसेच कैरो –इजिप्त येथे संपन्न झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धा-2022 स्पर्धेतील पदक प्राप्त 4 खेळाडू  आणि त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांच्या रोख पारितोषिक रक्कमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढ करुन पुढीलप्रमाणे पदक प्राप्त खेळाडूंना रोख पारितोषिकाची रक्कम जाहीर केली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा-2022 मध्ये क्रीडा स्पर्धेत संपादन केलेले सुवर्ण पदक विजेते खेळाडू रोख रक्कम 50 लाख रुपये आणि मार्गदर्शक यांना 12 लाख 50 हजार रुपये, रौप्य पदक विजेते खेळाडू रोख रक्कम 30 लाख रुपये आणि मार्गदर्शक यांना 7 लाख 30 हजार रुपये याप्रमाणे देण्यात येणार आहे.

जागतिक नेमबाजी स्पर्धा-2022 मध्ये संपादन केलेले सुवर्ण पदक विजेते खेळाडू वैयक्तिक रोख रक्कम एक कोटी 50 लाख रुपये, सांघिक खेळाडूला 50 लाख रुपये आणि मार्गदर्शक यांना प्रत्येकी 7 लाख 50 हजार रुपये, रौप्य पदक विजेते सांघिक खेळाडू रोख रक्कम 30 लाख रुपये आणि मार्गदर्शक यांना 5 लाख रुपये तसेच कांस्य पदक विजेते सांघिक खेळाडू रोख रक्कम 20 लाख रुपये आणि मार्गदर्शक यांना 2 लाख 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

पदक प्राप्त खेळाडू आणि त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली रोख पारितोषिकाची रक्कम सर्व संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्यास क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांनी मान्यता दिली असून मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही संचालनालयस्तरावर प्राधान्याने सुरु आहे, असे ( osmanabad jillah Sports Officer ) उस्मानाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी सांगितले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top