Osmanabad : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी यांचा मोदी @ 9 अंतर्गत मेरा बुथ सबसे मजबूत हा कार्यक्रम प्रतिष्ठान भवन येथे मा.आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
यावेळी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समर्पित बुथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शनवर संवाद संपन्न झाला. गेल्या ९ वर्षाच्या काळात भाजपा सरकारने समर्पित केंद्र आणि राज्य सरकारवर मोठा विकास घडवून आणला आहे. आगामी निवडणुकांसाठी बुथ सशक्तीकरण, मजबुतीकरण हा विषय अत्यंत महत्वपूर्ण असून या अनुषंगाने मा. मोदीजीने केलेले मार्गदर्शन, अत्यंत प्रभावी उध्दोधक आणि प्रेरणादायी ठरले.
सदर कार्यक्रमात नरेंद्र मोरी यांनी ९वर्षात केलेल्या विकासपूर्व कामाची माहिती मध्यप्रदेश येथील भोपाल येथे आयोजीत मेरा बुथ सबसे मजबूत आयोजीत सभेमध्ये दिली. त्याचे थेट प्रक्षेपण भाजपा भवन धाराशिव येथे संपन्न झाले. मोदी सरकारच्या ‘गरीब कल्याण’ कार्यक्रमातून गरीबांचे उंचावलेले जीवनमान, सर्वसमावेशक विकासामुळे जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था याची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सामान्य माणसांपर्यंत घरोघरी जाऊन पोहचवली जाणार आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील प्रदेश कार्यक सदस्य सतीश दंडनाईक, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर, परंडा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, उध्दवराव पाटील, अभय इंगळे, सतिष देशमुख, निहाल काझी, विद्यानंद राठोड, प्रविण पाठक, ओम नाईकवाडी, रमण जाधव, अमोल राजे निंबाळकर, संदीप इंगळे, दत्तात्रय देशमुख, आदी कार्यकर्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्यिथ होते