उस्मानाबाद शहरात व उमरगा येथे रस्ता अपघात , गुन्हा दाखल

0



उस्मानाबाद शहरात व उमरगा येथे रस्ता अपघात , गुन्हा दाखल 

उमरगा पोलीस ठाणे : बलसुर, ता. उमरगा येथील- रुक्मीन शिवलींग कुंभार, या दि.01.05.2023 रोजी दुपारी 02.00 वा. सु. बलसुर ते उमरगा येथे ॲपे रिक्षा मध्ये जात होत्या. दरम्यान ॲपे रिक्षा क्र एम एच 25 एन 0776  चा चालक नामे आकबर कासीम तांबोळी यांनी त्यांचे ताब्यातील रिक्षा हा हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवल्याने रिक्षा डिव्हायडरवर जावून पल्टी होवुन रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले. या आपघातात रुक्मीन या गंभीर जखमी होऊन मयत झाले. अशा मजकुराच्या रियाज इमाम शेख रा. बलसुर, ता. उमरगा यांनी दि.04.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 304 (अ) सह कलम 184, मो. वा. का.  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे : रसुलपुरा नागनाथ रोड, उस्मानाबाद येथील- इरशाल महेबुब कुरेशी, वय 45 वर्षे, हे दि.20.05.2023 रोजी रात्री  12.30 वा. सु. उस्मानाबाद शिवारातील शिंदे वकील यांचे शेताजवळील वळणावर वैराग ते उस्मानाबाद रोडवर पायी जात होते. दरम्यान टेम्पो क्र एम एच 15 बी.जे. 1810 चा चालक नामे रफीक पैंगबर पठाण रा. खिरणी मळा, उस्मानाबाद यांनी त्यांचे ताब्यातील टेम्पो हा हायगई व निष्काळजी पणे चालवून पायी जात असलेले इरशाल यांना पाठीमागून धडक दिली. या आपघातात इरशाल हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- जावेद महेबुब कुरेशी यांनी दि.04.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top