जिल्हा परिषद प्रशासनाकडून शिवस्वराज्य दिन सोहळा उत्सहात साजरा
उस्मानाबाद,दि,09(प्रतिनिधी):-दि.6 जून 2023 रोजी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमरतीच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने शिवस्वराज्य दिन सोहळा उत्साहत साजरा करण्यात आला.
यावेळी सामुहिक राष्ट्रगीत घेण्यात आले तसेच केंद्र प्रमुख श्री गीरी यांच्या पथकामार्फत महाराष्ट्र राज्य गीत गायन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून प्राप्त झालेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषदेच्य कै. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये, शिव व्याख्याते शसाईनाथ रुद्रके, सहशिक्षक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेक सोहाळा या विषयावर व्याख्यान देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता दुसरी तील विद्यार्थीनी कु. शेंदरकर या मुलीने शिवगर्जना म्हणून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशाल सुर्यवंशी सहशिक्षक यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शाम गोडभरले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधा साळुंखे, शिक्षणाधिकारी गजानन सुसार, तसेच जिल्हा परिषदेचे इतर खाते प्रमुख व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
*****