डॉ. पद्मसिंहजी पाटील यांच्या वाढदिवसा निमीत्त तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबीरात ७९० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार
उस्मानाबाद : डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसा निमीत्त आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन शनिवार दि.०३ जून २०२३ रोजी मौजे ढोकी ता. उस्मानाबाद येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात ढोकी व परिसरातील सर्व वयोगटातील ७९० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती निहाल काझी यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनंतराव देशमुख व प्रमुख पाहुणे मा. ग्रा.प. सदस्य बारी साहेब काझी, जेष्ठ नेते झुंबर (आबा) बोडके, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद देशमुख, ग्रा.प. सदस्य परवेज काझी, संजय पवार युवा नेते सतिश वाकुरे, विलास रसाळ, सोसायटी सदस्य दगडू देशमुख, शहराध्यक्ष प्रभाकर गाढवे, किशोर तिवारी, जिवण वीर, अंकुश जाधव, एजाज काझी, गणेश पवार, बबन देशमुख, नारायण कसबे, राजू रसाळ, शहाजी कांबळे, रेहान काझी, शशीकांत देशमुख, शकुर कोतवाल, रफीक वस्ताद, काका पाटील, ईनायत काझी, असलम पठाण, युसुफ शेख, अमर शिंदे, राजपाल लोखंडे इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ. अजित निळे, डॉ.फय्याज खान , डॉ. सलमान खान, डॉ. मनिष यादव, डॉ. देवश्री सुर्वे, डॉ. दानवी मोरे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हळ, संदिप खोचरे, सचिन व्हटकर, रवी शिंदे, व ढोकी केंद्राचे डॉ. स्वप्नाली इंगळे, सुपरवायझर कवीता मारवडकर, रेखा गुंजकर, जकीया शेख, सिस्टर काकडे, लोमटे, रत्नमाला आडसुळ व आशा कार्यकर्त्या प्राजक्ता पांचाळ, महादेवी गुरव, शमा तांबोळी, जरीना शेख, राजश्री शिंदे, आशा कदम, मनिषा ढवारे, मनिषा वीर, स्वाती दुधाने, स्वाती वीर, वैशाली क्षिरसागर, सविता लोमटे, मिनाक्षी गव्हाणे, शिल्पा कसबे, सरीता खोत, कल्पना कांबळे व शकुंतला सुतार यांनी परीश्रम घेतले.